
देवगड : कुणकेश्वर समुद्रकिनारी एक महत्त्वाचा तंत्रज्ञान संबंधित प्रात्यक्षिक पार पडला. यामध्ये स्वंयचलित (ऑटोमेटेड) रोबोटिक वॉटर क्राफ्टचा प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडला. या अत्याधुनिक वॉटर क्राफ्ट समुद्रामध्ये बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवणे शक्य होणार आहे. या स्वंयचलित (ऑटोमेटेड) रोबोटिक वॉटर क्राफ्ट प्रात्यक्षिकला कुणकेश्वर गावचे सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, सागरी तटरक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी ऋषिकेश चव्हाण, मंगेश मेस्त्री, अमित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
हा रोबोटिक वॉटर क्राफ्ट समुद्रावर वेगाने विना चालक सुरळीतपणे चालवण्यास सक्षम आहे. या स्वंयचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टबाबत बोलताना कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर म्हणाले की या रोबोटिक वॉटर क्राफ्टमुळे कुणकेश्वर पर्यटनाला चालना मिळणार आहे तसेच बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचवण्यास मदत होणार असुन कुणकेश्वर येथील यशस्वी प्रात्यक्षिकाने तंत्रज्ञानाच्या प्रगतीची एक नवी दालने खुली झाली आहेत.










