तांबळडेग समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 09, 2025 16:45 PM
views 110  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील समुद्र किनारी नवतरुण नवरात्र उत्साही मंडळ तांबळडेग मधलीवाडी या मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, या स्वच्छता मोहिमेदरम्यान कचरा गोळ्या करण्यासाठी हॅन्ड ग्लोज आणि पिशव्या वसंत सनये यांनी उपलब्ध करून दिले तर माजी उप सरपंच रमाकांत सनये यांनी पाण्याच्या बॉटल्स दिल्या. शिवचंद्र धुरी यांच्या कडून अल्पोपहारचे वाटप करण्यात आले,यावेळी तांबळडेग पोलीस पाटील विठ्ठलदास राजम, ग्रामपंचायत माजी सदस्य विद्या उपाणेकर, देवानंद केळुसकर, दत्तविजय कुबल, नवतरुण नवरात्र उत्साही मंडळ अध्यक्ष पांडुरंग शिरवडकर, सचिव दिपक कांदळगावकर, शिवचंद्र धुरी, सुरेशदेव सारंग, नंदू सनये, चंद्रशेखर उपानेकर,ज्ञानदेव कोचरेकर, कमलेश कुमठेकर,नंदू कांदळगावकर, संजय कोंयडे, शंकर भाबल,  संदेश मालंडकर ,अमित केळुसकर,अजय सनये,जयेश पराडकर,नारायण निवतकर,सचिन राजम,निलेश्री सादये,प्रेरणा सनये,साक्षी कुबल,नमिषा कुबल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते,