
देवगड : आवडेल तेथे प्रवास या योजनेतील ४ दिवसाच्या व ७ दिवसांच्या प्रवासी पास चे दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना देण्यात येणाऱ्या “आवडेल तेथे प्रवास” या योजनेतील ४ दिवसाच्या व ७ दिवसांच्या प्रवासी पास चे दर दि ८ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजले पासून कमी करण्यात आले आहेत .
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ पासून साधी (साधी, जलद रात्रसेवा आणि आंतरराज्य, शहरी मिडी बस)४ दिवसाच्या पावसाचे मूल्य प्रौढांसाठी रु. १३६४/- व मुलेरु ६८५ /- ७ दिवसांच्या पासाचे मूल्य प्रौढ रु२३८२/- मुले ११९४/- याप्रमाणे करण्यात आले आहे तसेच शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ४ दिवसाच्या पासाचे मूल्य प्रौढरु १८१८/- मुले रु ९११/- ७ दिवसांच्या पासाचे मूल्य प्रौढ रु ३१७५/- मुले रु१५९०/- या व्यतिरिक्त १२ मीटर ई- बस ( इ शिवाई) ४ दिवसाच्या पासाचे मूल्य २०७२/- व मुलांकरता १०३८/-७ दिवसांच्या पासचे मूल्य रु३६१९/-आणि मुले रु १८१२/- याप्रमाणे ठेवण्यात आले आहे.
या आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ प्रवाशांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा असे आवाहन देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी केले आहे.










