
देवगड : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून, हा सोहळा दि. ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. श्री ज्ञानराज माऊली सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा व्यासपीठ चालक गुरुवर्य मित्र संत परिवार ह. भ. प. बंडातात्या महाराज कराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे आयोजक श्री सदगुरू संत बाळूमामा मंदिर दाभोळे कोंडामा ह. भ प. बबन रघुनाथ बोडेकर, संजय यशवंत बोडेकर, असून व्यसनमुक्त युवा संघ महाराष्ट्र व वारकरी संघ कराड आणि ज्ञानेश्वरी पारायण मंडळ जळगाव तालुका कराड जिल्हा सातारा यांचे देखील या सोहळ्याला सहकार्य लाभले आहे. तसेच स्वयंभू श्री देव कुणकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत ह.भ. प.बंड्यातात्या महाराज कराडकर यांची प्रवचन सेवा लाभणार आहे. अधिक माहितीसाठी 9422321234, 7350183000, 942107459 या क्रमांकावरती संपर्क करावा.










