
देवगड : देवगड येथील युथ फोरमच्या वतीने आयोजित आणि रसिका अनिलकुमार सारंग, सह. सचिव युथ फोरम देवगड यांच्या संकल्पनेतून जी. टी. साटम सभागृह येथे, देवगड नागरी संस्था "सन्मान नवदुर्गांचा: स्त्रीशक्तीचा" हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाद्वारे देवगडमधील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. घरसंस्कार सांभाळत, समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करीत पुढील पिढीसाठी आदर्श घालणाऱ्या या महिलांच्या कार्याची दखल म्हणून युथ फोरम देवगडने त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त केला, असे संस्थेचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले.
संस्थेतर्फे प्रियांका साळसकर, अनुश्री पारकर, अनुजा गांधी, सरिता तारकर, विकंक्षा जाधव, साधना निकम, वैष्णवी जोईल, श्रेया पोकळे, ॲड. अवनी गोरे या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर देवगड-जामसंडे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, देवगड तालुका वकील संघाच्या उपाध्याक्ष ॲड. मैथिली खोबरेकर, युथ फोरम देवगडच्या सह.सचिव रसिका सारंग, कार्यकारिणी सदस्य ॲड. श्रुती माणगावकर, तसेच देवगड-जामसंडे शहर कमिटी सचिव आज्ञा कोयंडे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम महिलांच्या सामर्थ्याची आणि सामाजिक योगदानाची प्रेरणा ठरला.यावेळी युथ फोरम देवगडचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगावकर, सचिव अमित पारकर, शहर अध्यक्ष ओंकार सारंग, उपाध्यक्ष जितेश मोहिते, सोहम पारकर, दिपक जानकर, सलोनी कदम, श्रेयस कडू, पीयूष केतकर, राधा जगताप, अचल वर्मा, पडेल सरपंच भूषण पोकळे, शीतल कदम, आशा घोगरे, ॲड. दिप्ती हळदणकर, वैशाली पोकळे तसेच युथ फोरम देवगडचे इतर सदस्य आदी उपस्थित होते.










