
देवगड : देवगड येथील विजयादशमी दसरा हा शासकीय सोहळा उत्साहात सपन्न झाला. देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार दिवाणी न्यायालय चे कार्यालय अधीक्षक सुशांत परब यांच्या हस्ते विधिवत पूजन ग्रामोपाध्ये विलास गोगटे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी आपट्याच्या झाडाची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर आरती झाल्यावर तहसीलदार व अधीक्षक यांच्या हस्ते सोने लुटणेस सुरुवात करून उपस्थित नागरिकांनी विजयादशमीच्या सोने लुटण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांनासोने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नायबसाहेब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जेष्ठ नागरिक सुरेश सोनटक्के, गणेश गोडबोले, नारायण गद्रे, डॉ. प्रमोद आपटे, सेवानिवृत्त उपनिरीक्षक शेखर गोळवणकर पोलीस नाईक प्रवीण सावंत, सूर्यकांत पाळेकर, वसंत मोहिते, प्रसाद पारकर, शंकर तारकर, महेश खवळे, अरविंद खवळे, सचिन खवळे, सुनील खडपे, महेश फाटक, सुनील राणे, प्रदीप सावंत, अरविंद खवळे, शैलेश कदम,अनिल आपटे आदी उपस्थित होते.










