जखमी साळिंदराला जीवनदान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 30, 2025 18:45 PM
views 87  views

देवगड : देवगड तालुक्यातील नाद या गावातील अविनाश तोरस्कर हे आपल्या शेतातील गवत ग्रासकटर ने कापत असताना त्यांना एक साळिंदर जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. अशक्तपणा आलेले अवस्थेत हे साळींदर असल्यामुळे त्यांनी लगेच तेथील शेताचे राखणदार असलेले तसेच कलाकार अक्षय मेस्त्री यांना फोन करून या गोष्टीची कल्पना दिली. लगेच त्यांनी त्यांच्या चित्र शाळेत नेऊन त्यावर औषध उपचार करण्यास सुरुवात केली. त्या साळिंदराला औषध उपचार करून खायला दिल्यानंतर त्याठिकाणी उपचार झाले व वनविभाग मधील रमेश गुगे यांना या विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या साळिंदराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.