देवगड : फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तसेच सिव्हील इंजिनियर दिलीप कदम यांची किंजवडे गावाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.संरपंच संतोष किंजवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली किंजवडे ग्रामपंचायतीची ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेस किंजवडे सोसायटीचे चेअरमन किरण टेंबूलकर,उपसरपंच विनय पाडावे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महेश टुकरूल, किंजवडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आनंद कदम,माजी पंचायत समिती अध्यक्ष अरविंद भोगले, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक हनूमंत तेरसे, ग्रामस्थ उपस्थित होते.या निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोक मसूरकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.










