
देवगड : सेवा पंधरवडा अंतर्गत महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार येथील विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखल्यांचे वितरण देवगड तहसील कार्यालयाचे तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. देवगड तहसीलदार आर .जे .पवार यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत आपले विचार यावेळी व्यक्त केले. यावेळीतळेबाजार शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष वरेरकर,देवगड तहसील कार्यालयाचे तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशीद तसेच महा.ई .सेवा केंद्राचे संचालक राजेश सनये, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक आर . एस. वाळके सर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश व इतर शासकीय लाभांसाठी आवश्यक असणारे जातीचा दाखला, वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी ही विशेष मोहीम यानिमित्ताने राबवण्यात आली होती.त्यामध्ये दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सौ.मृण्मयी जाधव तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सुशील जोईल यांनी केले.










