सौंदाळेत साडेसात हेक्टरवर उभारण्यात येणार मत्स्य महाविद्यालय

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 27, 2025 18:28 PM
views 304  views

देवगड : देवगड तालुक्यातील सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर  उभारण्यात येणार मत्स्य महाविद्यालय या कॉलेज साठी दीडशे कोटीचा प्रस्ताव असून मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे.यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर हे मत्स्य महा विद्यालय उभारण्यात येणार आहे. मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार असून,देवगड तालुक्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये हे मस्य महाविद्यालय होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.

यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे पारंपारिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.देवगड सारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय मिळणार आहे.

या संदर्भात 26 ऑगस्ट रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.