
देवगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत दाभोळे येथे शाळा तेथे दाखले अभियान राबविण्यात आले.या वेळी देवगड तहसिलदार रमेश पवार , गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
शाळा तेथे दाखले ही विशेष मोहीम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या छान संकल्पनेचा भाग असुन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा नाविन्यपुर्ण उपक्रम होत असुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम देवगड तालुक्यात यशस्वी करूया असे प्रतिपादन देवगड तहसिलदार रमेश पवार यांनी केल .
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण म्हणाले की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शालेय पातळीवरच उपलब्ध होणार असून पालक व विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च व श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या नाविन्यपुर्ण उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्या असे आवाहनही गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले . तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत विशेष प्रयत्नातून 87 जात प्रमाणपत्र व वय अधिवास प्रमाणपत्र गावातील तिन्ही शाळेमध्ये कॅम्प आयोजन करून दाखले तयार करण्याची मोहीम राबवली व दाखले उपलब्ध करूनही दिले. याबाबत तालुक्यात ग्रामपंचायत दाभोळे यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष अभिनंदन तहसीलदार रमेश पवार व गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी केले
सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तिथे दाखले या अभियानात देवगड तहसिलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री . दिगंबर खराडे ,विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , सरपंच दाभोळे श्रीकृष्ण अनभवणे, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेटगे आदी मान्यवरांच्या हस्ते दाभोळे शाळा नं१ येथे मुलांना अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधी मध्ये राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे . याच अनुषगाने दाभोळे शाळा नं .१ व शाळा नं 2 व कोंडामा येथील एकुण ८७ विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र व वय अधिवास प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले .
सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तेथे दाखले ही विशेष मोहीम राबविण्याकामी दाभोळे शाळा नं .१ मुख्याध्यापक शिवराज पाटील , केंद्रचालक जनार्दन लोरेकर , ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेटगे यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला विदयार्थी , पालक , अंगणवाडी सेविका , शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेटगे व आभार सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी मानले .










