
देवगड : भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्याकडून मराठवाडा अतिवृष्टी ग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले होते.
त्याला तत्काळ प्रतिसाद देत भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये अकरा हजार रुपये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पीडित शेतकरी व कुटुंबांना मदतीसाठी पाठवले.पीडित शेतकरी कुटुंब हे लवकरात लवकर या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडावेत अशी प्रार्थना देखील केली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहना प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने सढळ हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करावी असे आवाहनही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले.










