
देवगड : विजय क्रिडा मंडळ, साई हिल , भांडुप ,व मंडळाचे सदस्य तसेच मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या माध्यमातून व मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष पप्पु जाधव यांच्या सहकार्याने ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,देवगड किल्ला येथील शाळेत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना हे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोबत सहकारी मनविसे शहर अध्यक्ष अभिजीत तेली व शाळेतील शिक्षक वर्ग आदी उपस्थित होता.










