
देवगड : देवगड येथे येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले असून या शिबिराला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत देवगड येथील ग्रामीण रुग्णालय येथे महिला आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी उमेश पाटील, वैद्यकीय अधिकारी संजय विटकर भाजप शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील जिल्हा रुग्णालय आणि जी.एम.सी. सिंधुदुर्ग येथील डॉक्टर्स यांच्या मार्फत आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराची सुरुवात सकाळी योग सत्र आणि स्वच्छता अभियान झाली शिबीरासाठी ४२४ लाभार्थी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये असंसर्गजन्य रोग ( मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग) तपासणी नेत्र तपासणी, दंत तपासणी, गरोदर महिला आणि बालक तपासणी,आयुष आणि योग उपचार,क्षय रोग तपासणी,मानसिक रोग तपासणी,कान नाक घसा तपासणी अशा सुविधा देण्यात आल्या.तसेच रक्त तपासणी,ecg ,x ray,bsl तपासणी,hb तपासणे या सेवा देण्यात आल्या.याशिवाय विविध पोषक पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.यात र क्तवाढी साठी, हाडांसाठी पोषक , टीबी रोगामध्ये उपयोगी अशा विविध आरोग्यदायी पदार्थांचा समावेश केला होता
समुपदेशन करण्यासाठी विविध वयोगटांसाठी वेगवेगळे विषय घेऊन व्याख्याने आयोजीत केली होती. यात मानसिक आरोग्य, स्तनपान आणि माता बालक आहार., क्षयरोग जागरुकता, रक्त क्षय आणि मासीक पाळी तील स्वच्छता, व्यसाधिनता अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते.
अवयवदानाची माहिती देऊन इच्छुकांचे form भरण्यात आले आणि रुग्णांना इ संजिवनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. उदघाटन कार्यक्रम मध्ये कुपोषित मुलांना आणि क्षय रुग्णांना भाजप तालुका कार्यकारीणी तर्फे फूड बास्केट देण्यात आली.आयुष्मान ,कार्ड आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले.कार्यक्रम चा समारोप करताना 2 बालकांना अन्नप्राशान करून उदघाटन कार्यक्रम ची सांगत करण्यात आली.या वेळी तालुका आरोग्य अधिकारी उमेश पाटील,प वैद्यकीय अधिकारी संजय विटकर,प्रकाश पाटोडेकर, भाजप शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील जिल्हा रुग्णालय आणि जी.एम.सी. सिंधुदुर्ग येथील डॉक्टर्स आदी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.










