कांदळवन वृक्ष तोडल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 25, 2025 20:40 PM
views 777  views

देवगड : कांदळवन वृक्ष तोडल्याप्रकरणी  तेथिल शामसुंदर गणपत कोयंडे यांच्याविरूध्द देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार कणकवली उपविभागीय अधिकारी तथा तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण संवर्धन समिती अध्यक्ष जगदीश कातकर यांनी दिली. टेंबवली कालवी येथील शामसुंदर गणपत कोयंडे यांनी दि. १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १० वा. सुमारास कांदळवन वृक्ष तोडण्यास बंदी आहे. हे माहित असताना कालवी खाडीतील कांदळवन वृक्षाची तोड केली. याबाबत देवगड पोलिस स्थानकात उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 15(1) अन्वये शामसुंदर कोयंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस हवालदार प्राजक्ता कविटकर यांच्या कडून या घटनेचा तपास सुरू आहे.