
देवगड : बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नाडण गावातीकी ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असून नाडण गाव सध्या भीतीच्या छायेखाली असून नाडण गावामध्ये नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या बिबट्याने २० सप्टेंबरच्या मध्यरात्री नाडण वरची पुजारे वाडी येथील सुनील लक्ष्मण पुजारे यांचे घराचे अंगणात बिबट्याने प्रवेश करून अंगणात बांधलेले गाईचे चार महिन्याचे वासरू घेऊन गेला. त्यावेळी कुत्र्यांचे मोठ्याने भुंकणे व गाय बैलांचे जोराने हंबरने नागरिकांना ऐकू आले. त्यावेळी अंगणातील लाईट लावण्यात आली अंगणात गाईचे वासरू नव्हते. अंगणात थोडेसे रक्त पडलेले व झटापटीचे ओरखडे नागरिकांना दिसले.
त्यावेळी खात्री झाली की वासरू बिबट्याने नेले. असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गावामध्ये सध्या नवरात्र उत्सव सुरू असून रात्री अपरात्री घरा बाहेर पडताना ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होताना दिसत आहे.










