देवगडात पोषण महाअभियानाला प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 22, 2025 13:51 PM
views 302  views

देवगड : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय  एकात्मिक बाल  विकास सेवा योजना कार्यालय देवगड यांच्या वतीने देवगड प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षिका पूजा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरगांव बीट मधील अंगणवाडी सेविकांनी साळशी, कुवळे व तळेबाजार येथे पोषण महाअभियानाची दमदार सुरवात केली. हे अभियान १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार असुन या अभियान अंतर्गत लठ्ठपणा कमी करणे,साखर व तेलाचे सेवन कमी करणे, बालपणीची काळजी आणि शिक्षण(ECCE) / पोषणही शिक्षणही (PBPB)अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF)पुरुष सहभाग(Men-streaming)

व्होकल फॉर लोकल – स्थानिकसक्षमीकरण वस्वावलंबनासाठी एकत्रितकृती व डिजिटायझेशन याबाबत मार्गदर्शन तसेच फुगडी व भजनाच्या माध्यमातुन पोषण महाअभियानाचा जागर करण्यात आला. देवगड तालुक्यातील शिरगांव बीटमधील तीनही गावांत मोठया संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक तसेच बालकांनी सहभाग घेतला होता.

या अभियानाचा मुळ उद्देश प्रत्येक घरात पोषणाचा संदेश पोहचवणे हा असुन तो साध्य करण्यासाठी आम्हाला तीनही गावांत चांगला प्रतिसाद लाभला असेच पुढील कार्यक्रमाला सहकार्य लाभावे असे आवाहनही पर्यवेक्षिका पूजा सांवत यांनी केले.