
देवगड : रतनकुमार विठ्ठल झाजम यांची तळवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून ग्रामपंचायत तळवडे, बागतळवडे, तळेबाजार. यांची शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली आहे.
गावचे समाजसेवक,माईबाबा प्रतिष्ठानचेमुखविश्वस्त,सेवानिवृत्त अग्निशमन अधिकारी रतनकुमार विठ्ठल झाजम यांची गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल. सरपंच गोपाळ रुमडे व ग्रामसेवक गुणवंत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.उपस्थित ग्रामस्थांन च्या वतीने नवर्निवाचीत अध्यक्षांचे स्वागत यावेळी करण्यात आले.
यावेळी सरपंच उपसरपंच यांच्या सह सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.सभेमध्ये विविध विषयासह तटां मुक्त समीतीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी अध्यक्षपदी रतनकुमार झाजम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.










