देवगडमधील १३ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता उत्सव

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2025 19:47 PM
views 83  views

देवगड : आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त देवगड तालुक्यातील १३ समुद्र किनाऱ्यावर  स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते . या  १३ ठिकाणी  ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे १३ ही समुद्रकिनारी एकाच दिवशी स्वच्छचा मोहिम यशस्वी झाल्याबद्दल पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी अरूण चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी ग्रामपंचायतींचे कौतुक केले.

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी , कुणकेश्वर , रामेश्वर , विजयदुर्ग , गिर्ये , तांबळडेग, मिठबांव , तांबळडेग, हिंदळे , फणसे , पडवणे , पुरळ , कातवण  या ठिकाणी स्वच्छता दिनाचे औचित्य साधुन समुद्र किनारी स्वच्छता अभिमान राबवण्यात आली . यासाठी ग्रामपंचायतींनी उत्तम नियोजण केले . या समुद्र किनारे मोहिमेसाठी पंचायत समिती देवगड कडून नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मिठमुंबरी  येथे अप्पर पोलीस अधिकारी नयोमी साटम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत विभाग )जयप्रकाश परब , गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण तसेच कुणकेश्वर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब , गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी अभियानात सहभाग घेत मार्गदर्शन केल .

पावसाळ्यात साचलेला कचरा या अभियानामुळे समुद्र किनारे चकाचक झालीत या अभियात ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी , उमेद अभियानातील बचत गट महिला प्रतिनिधी , शाळा , अंगणवाडी , विविध संस्था , पोलीस विभाग , कॉलेज , आरोग्य विभाग व मोठया संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते .