मिठमुंबरीत समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 20, 2025 18:56 PM
views 94  views

 देवगड : आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्या माध्यमातुन मिठमुंबरी समुद्र किनारी स्वच्छता मोहिम अप्पर पोलीस अधिकारी नयोमी साटम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधिकारी नयोमी साटम म्हणाल्या की देवगड तालुक्यातील सागरी किनारे पर्यटनदृष्टया महत्वाचे असुन या ठिकाणी निरंतर स्वच्छता राहावी यासाठी  अशा प्रकारे विशेष नियोजन करणे आवश्यक  असल्याचे प्रतिपादन केले . तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प )जयप्रकाश परब यांनी मोठया संख्येने उपस्थित सर्व सहभागी सर्वांचे कौतुक करत अशाच प्रकारे  सर्वांनी सहभागी होऊन समुद्र किनारे स्वच्छ राहतील यासाठी सर्वांनी एकत्र यावेत असे आवाहनही त्यांनी केले .

स्वच्छता मोहिमेमुळे  मिठमुंबरी समुद्र किनारा स्वच्छ झाला या मोहिमेमध्ये गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे , मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर , उपसरपंच गुरुनाथ गांवकर , पोलीस निरीक्षक भरत धुमाळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे , पोलीस पाटील दयानंद मुंबरकर ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , अधिक्षक कुणाल मांजरेकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , तालुका अभियान व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी हेमंत हळदणकर , ग्रामपंचायत अधिकारी प्रिती ठोंबरे , ग्रामपंचायत अधिकारी सचिव श्रद्धा आळवे तसेच पंचायत समिती देवगड कर्मचारी , ग्रामपंचायत  सदस्य , ग्रामपंचायत अधिकारी , स .ह. केळकर कॉलेज विदयार्थी , प्राध्यापक कामत सर, मिठमुंबरी जि.प. शाळेचे विदयार्थी तसेच शिक्षक , माध्यमिक विदयामंदीर हायस्कुल कुणकेश्वर विद्यार्थी व शिक्षक ,  पतन विभाग अधिकारी , कर्मचारी , उमेद अभियानातील १४० महिला यामध्ये मिठमुंबरी, इळये ,पाटथर, व पडेल प्रभागातील महिला , मिठमुंबरी संस्थेचे प्रतिनिधी , ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

समुद्रकिनारी स्वच्छता करताना प्लास्टीक कागद , प्लास्टीक बॉटल ,थर्माकोल , समुद्रातुन वाहुन आलेला अविघटनशील मानवनिर्मित कचरा असा सर्व कचरा एकत्र गोळा करून समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेच्या शुभारंभाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक मधुसुदन घोडे  यांनी केले तर गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी  पांडुरंग शेडगे व सहकारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वछता मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी हातभार लावला. अभियानाच्या शेवटी ग्रामपंचायत मिठमुंबरी चे  सरपंच बाळकृष्ण गांवकर यांनी आभार  मानले .