
देवगड : शिवराज राठोड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेकविध अभियानामध्ये किंजवडे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. शिवराज राठोड यांची अचूकता, गुणवत्ता प्रभावी ठरत आहे.
पंचायत विकास निर्देशांक 1.0 मध्ये ग्रामपंचायत किंजवडे ला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज विभाग, मंत्री जयकुमार गोरे, प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन एकनाथ डवले (भा.प्र.से.), तसेच उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामविकास संस्था (यशदा, पुणे) डॉ. मल्लिनाथ कळशेट्टी यांच्या हस्ते, पुणे येथे शिवराज राठोड (ग्रामपंचायत अधिकारी, सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले.










