
देवगड : देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर तसेच तालुका प्रमुख जयेश नर, यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आ. वैभव नाईक, उपनेते अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्री वर जाऊन 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे आणि युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांच्या समवेत तालुका युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, तालुका महिला आघाडी संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, नगरसेवक तेजस मामघाडी, सुधीर तांबे, गणेश वाळके, महेंद्र उर्फ पिला भुजबळ, संतोष दळवी, अमित तोडणकर आदी उपस्थित होते.