
देवगड : देवगड- उमरगा ही देवगड आगाराकडून नवी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. रापम देवगड आगारातून स.६ वा. सुटणारी देवगड उमरगा प्रवासी फेरी सुरू करण्यात आली असल्याबाबत माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली आहे. ही प्रवासी फेरी स.६ वा. देवगड येथून सुटून ती गगनबावडा कोल्हापूर मिरज सांगोला मंगळवेढा सोलापूर नळदुर्ग मार्गे उमरगा अशी जाणार आहे. व परतीच्या प्रवासाला उमरगा येथून स.६.३० वा. वरील मार्गाने देवगड कडे येणार आहे. या प्रवासी फेरीचा प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक देवगड यांनी केले आहे.या पहिल्या प्रवासी फेरीचा मान चालक कम वाहक श्री ढबाले,आणि केंद्रे हे सेवा बजावीत आहेत.
दरम्यान या मार्गावर सोडण्यात आलेली पहिली फेरी ही देवगड सांगली या गाडीच्या वेळेस सोडण्यात आल्याने ही गाडी राधानगरी मार्गे सांगली गाडीच्या वेळेस सोडण्यात आली आहे. मात्र उद्यापासून देवगड उमरगा ही जादा गाडी सकाळी सहा वाजता देवगड नांदगाव तरळा भुईबावडा गगनबावडा मार्गेच सोडण्यात येईल अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.