महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक

देवगड तालुका विज्ञान प्रदर्शन
Edited by:
Published on: November 29, 2024 10:56 AM
views 257  views

देवगड :  देवगड तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी वृषाली कुळये व कुमारी योगिता रसाळ यांच्या अत्याधुनिक प्रसुती कक्ष वहन या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. जामसंडे हायस्कूल येथे आयोजित केलेले होते.

या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेमध्य महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी वृषाली कुळये व कुमारी योगिता रसाळ यांच्या अत्याधुनिक प्रसुती कक्ष वहन या प्रतिकृती ला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. या साठी त्यांना मार्गदर्शक लाभले विज्ञान शिक्षक जोईल सर व प्रथम क्रमांक प्राप्त दोन्ही विद्यार्थिनींचे या प्रशालेचे संस्था अध्यक्ष संदीप तेली ,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार  संतोष वरेरकर,सचिव साटम  सर्व संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक ,सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,पालक संघ आणि विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.