
देवगड : उच्च माध्यमिक परीक्षेत देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के लागला असून या उच्च माध्यमिक परीक्षेत देवगड न.शा.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची तनिष्का दळवी प्रथम,तर शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत महाजन द्वितीय तर देवगड कनिष्ठ महाविद्यालयाची अनुष्का तावडे तृतीय क्रमांक पटकावला आहे. यापरीक्षांमध्ये न.शा.पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची कला शाखेची विद्यार्थीनी तनिष्का विनय दळवी(९१.६७) ही तालुक्यात प्रथम व शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत राकेश महाजन(९०.६७), याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर देवगड न.शां.पंतवालावर कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची अनुष्का संजय तावडे(९०.५०) टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे.तालुक्यातुन १०४७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यमध्ये ५८ प्रथम श्रेणी २८०, द्वितीय श्रेणी ५५७ आणि तृतीय श्रेणीत १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
तालुक्यातील उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे
एन्.एस्.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड ९७.५४ टक्के ५७१ पैकी ५५७ उत्तीर्ण
बारावी विज्ञान २२८ पैकी २१८ उत्तीर्ण , १०० टक्के निकाल
प्रथम रोहीत प्रमोद मेस्त्री(८८), द्वितीय अथर्व सदानंद नाईकधुरे(८३.५०), तृतीय वेदांत संदेश सावंत(८०.५०)
बारावी कला १३६ पैकी १२१ उत्तीर्ण, ८९ टक्के निकाल
प्रथम तनिष्का विनय दळवी(९१.६७), द्वितीय शौरीन संजीव देसाई(८३.१७), तृतीय भक्ति विठ्ठल पाटणकर(७९.८३)
बारावी वाणिज्य २१९ पैकी २१९ उत्तीर्ण, १०० टक्के निकाल
प्रथम अनुष्का संजय तावडे(९०.५०), द्वितीय शुभम भागवत बुधकर(८९.३३), तृतीय प्राप्ती स्वानंद राणे(८९)
बारावी एमसीव्हीसी ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण, १०० टक्के निकाल
प्रथम प्रांजली प्रकाश घाडी(७९), द्वितीय किरण संतोष तांबे(७८.८३), तृतीय वैष्णवी दिपक धुरी(७८.१७) विभागून दिव्या गोपाळ घाडी(७८.१७)
देवगड महाविद्यालयात चारही शाखात कला शाखेची तनिष्का विनय दळवी ही विद्यार्थीनी ६०० पैकी ५५० गुण ९१.६७ टक्के गुण मिळवुन तालुक्यात, केंद्रात व महाविद्यालयात प्रथम आली आहेदेवगड तालुक्यातील अन्य कनिष्ठ महाविद्यालयाचे निकाल पुढील प्रमाणे .
देवगड कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय द्वारा शेठ म.ग हायस्कूल, देवगड महाविद्यालयाचा बारावी२०२४/२५ वाणिज्य शाखा
निकाल १००% लागला असून यात
प्रथम क्रमांक – कु.अपर्णा अरविंद गुरव (५६%)*
द्वितीय क्रमांक – कु.आदिती अरविंद गुरव (५३.१७%)
*तृतीय- कु. शिवानी प्रल्हाद पाटील (५३%)*यांनी प्राप्त केला आहे.
श्री नामदेव माेतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त)कनिष्ठ महाविद्यालय माेंड निकाल टक्के
कला वाणिज्य संयुक्त निकाल ९५.३१ टक्के ६४ पैकी ६१ उत्तीर्ण-झाले.
प्रथम प्रगती शैलेश टूकरल(७२.६७), द्वितीय तृप्ती भिकाजी नरसाळे(७१.३३), तृतीय स्वरांगी सुभाष माेंडे(७१)
शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव निकाल ९९.१७ टक्के
वाणिज्य शाखा १०० टक्के, ८५ पैकी ८५ उत्तीर्ण
प्रथम राेहीत राकेश महाजन(९०.६७), द्वितीय चंदना रविकांत पवार (८९), तृतीय वैभव गाेपाळ लाेके(८७.५)
कला शाखा ९७.२२ टक्के निकाल ३६पैकी ३५ उत्तीर्ण
प्रथम हर्ष विलास खडये(६२.१७), द्वितीय सानिका रमाकांत शिरगावकर व सनिका सचिन जाधव(५७.५०), तृतीय गाैरी साेनू झाेरे(५६.१७)
श्रीराम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पडेल
बारावी वाणिज्य १०० टक्के निकाल ३४ पैकी ३४ उत्तीर्ण
प्रथम संचिता संताेष घाडी(७९.३३), द्वितीय श्रुतिका संदीप घाडी(७८.८३), तृतीय कृतिका दिलीप देवळेकर(७६.५०)
बारावी कला ९०टक्के निकाल २० पैकी १८ उत्तीर्ण
प्रथम रिया रविंद्र धावरे(५७.५०), द्वितीय पूर्वा विजय वारीक(५४.८३), तृतीय अदिती अशाेक वारीक(५४.५०)
कै. साै.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं)कनिष्ठ महाविद्यालय मुटाट १००टक्के निकाल, २८ पैकी २८ उत्तीर्ण
वाणिज्य शाखा १०० टक्के निकाल १५ पैकी १५ उत्तीर्ण
प्रथम-भावेश प्रकाश माेंडे(६६ टक्के), द्वितीय पायल विठ्ठल माळकर(६५.५०), तृतीय श्रावणी संजय भाट(६४.८३)
कला शाखा १०० टक्के १३ पैकी १३ उत्तीर्ण
प्रथम -चंदना संदीप घाडी(६२.८३), द्वितीय चंदना विजय येरम(५८.५०), तृतीय सानिका संजय पुजारे(५६.८३)
श्रीराम माेरेश्वर गाेगटे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यामंदीर,जामसंडे ज्युनिअर काॅलेज निकाल ९५.४५ टक्के
इलेक्टिकल विभाग १०० टक्के निकाल
प्रथम- पियुष दयानंद कदम(७५.३३), द्वितीय निखील देवेंद्र घाडी(६४), तृतीय मयुर सुनिल नवलू व कुणाल धनंजय सावंत(६३.३३)
इलेकट्रोनिक्स विभाग ९०.०९ टक्के निकाल
प्रथम साईल सचिन घाडीगावकर(६७.१७), द्वितीय जगदीश यशवंत सारंग(६५.१७), तृतीय हर्ष अनिल राणे(६४.८३)
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव निकाल शंभर टक्के लागला असून ८४ पैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून ५४ टक्के लागला असून प्रथम क्रमांक जान्हवी शंकर गुरव ८१.६७ द्वितीय व वत्सला परशराम अनभवणे ७८.५० तृतीय क्रमांक सर्वेश सुनील दुसनकर ७४.१७ कला शाखा १०० टक्के निकाल ३० पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण प्रथम क्रमांक अमिषा दीपक बाणे ६३.३३ चंदना मंगेश पाटील ५८.५० तृतीय प्रतीक्षा प्रकाश पाले ५८.३३
जुनियर कॉलेज ऑफ आर्टस मिठबाव चा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक विद्या अ.तेली,(५५.००)द्वितीय क्रमांक अनुजा म.धुवाळी,(५३.८३)तृतीय क्रमांक निकेश रा. कोळंबकर (५२.००) यांनी प्राप्त केला.