
देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे सफाई कामगार गेले दोन महिने पगार न मिळाल्याने त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. बिन पगाराचे कामगार नगरपंचायत विभागात साफसफाई करत आहेत. नगरपंचायत यांनी कंत्राटदार याचे पेमेंट न केल्याने कामगारांना पगार मिळत नसल्याचा आरोप देवगड मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी केला.
गेल्या नोव्हेंबर 2023 चा पंधरा दिवसाचा पगार ही अजून मागील कंत्राटदार यांनी कामगारांना दिलेला नाही. सर्व कामगार घर संसार कसा चालवायचा या विवंचनेत सध्या काम करत आहेत. काही कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद असल्याचे मयेकर यांनी सांगितले आहे. या संदर्भात लवकरच नगरपंचायत मुख्य अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे देवगड मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांनी सांगितले आहे..