देवगड छेडछाड प्रकरण | नितेश राणेंच्या पोलीस प्रशासनाला महत्वाच्या सूचना

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 27, 2024 07:44 AM
views 425  views

देवगड : देवगड तालुका शांत तालुका असून पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेला व पर्यटकांचे आकर्षण असलेला तालुका आहे. या तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी देवगडमध्ये आल्यावर पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा पण अशा पद्धतीच्या येथील महिला भगिनींच्या छेडछाड किंवा अन्य घटना घडल्यास त्याचे परिणाम काय होतात याची कल्पना त्यांना निश्चितपणे आली आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्याचप्रमाणे नियमित पेट्रोलिंग पर्यटन भागात करणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कारवाई करण्यात यावी या पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी येथील स्थानिक नागरिकांनी या छेडछाडच्या घटनेनंतर घेतलेल्या भूमिकेचे स्वागत त्यांनी करून स्थानिक बीट अंमलदारांनी देखील नागरिकांना चांगली वागणूक देणे गरजेचे आहे. अशी सूचनाही पोलीस निरीक्षकांना केली. देवगड मध्ये आल्यानंतर कुठल्याही पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटत असताना मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काय होतात हे या घटनेतून बाहेरील पर्यटकांना दिसून आले असेल येथे येणारा पर्यटक हा निश्चितपणे चांगलाच असतो परंतु अशा चुकीच्या व छेडछाड या घटनेमुळे नाहक वातावरण बिघडते ते अयोग्य आहे.

या चर्चेच्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी अपुरा अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग बाबत अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संबंधित विभागाशी  चर्चा करणार आहेत. असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरा चालू स्थितीत ठेवण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाशी बोलताना दिली.  त्या पुढील काळात अशा पद्धतीच्या देवगडमध्ये होता कामा नये यासाठी पोलीस प्रशासनाने अधिकाधिक विशेष मोहीम राबवावी.या पुढील काळात नवरात्री उत्सव व अन्य कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या कार्यक्रमाला देखील कोणत्याही प्रकारचे गालबोट अथवा अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे असेही सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर ,अध्यक्ष राजू शेटे शरद ठूकरूल शहराध्यक्ष दयानंद पाटील, योगेश पाटकर , नगरसेविका तन्वी चांदोसकर ,प्रणाली माने, रूचाली पाटकर,आद्या गुमास्ते , उषःकला केळुस्कर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पीडित मुलगी व कुटुंबीय यांची भेट घेवून धीर दिला.