देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे - पडेल युवा मंडल अध्यक्षपदी सचिन कोकरे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 17, 2024 13:52 PM
views 183  views

देवगड : भाजपा भटके विमुक्त आघाडी देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवड तर देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे व पडेल युवा मंडल अध्यक्ष पदी सचिन कोकरे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केले. या तिन्ही निवडी देवगड मंडल अध्यक्ष संतोष साळसकर व पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे यांच्या शिफारसीने करण्यात आल्या. देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू असे या नवीन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी आमदार ॲड. अजित गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी बाळा गोसावी, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.