देवगडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात ..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 02, 2024 11:59 AM
views 200  views

देवगड : पंचायत समिती देवगड येथे १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले . यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे , गटशिक्षण अधिकारी  कैलास राऊत ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे,पशुधन अधिकारी विवेक ढेकणे ,अधिक्षक मेधा राणे , कनिष्ठ लेखाधिकारी विनय प्रभु, कृषि विस्तार अधिकारी मदने आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी विषय तज्ञ नारायण चव्हाण सर व शिक्षक दत्तात्रय घाडी सर यांनी देशभक्तीपर गाणी सादर केलीत.

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी  श्री .सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पुजेचा मान कनिष्ठ सहाय्यक कमलेश गावडे , धनश्री गावडे या दापत्यांना  मिळाला , विस्तार अधिकारी अंकुश जंगले यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली. संध्याकाळी ४ वाजता पंचायत समिती देवगड कर्मचारी यांच्यासाठी फनी गेम्स स्पधेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांक हवालदार रमेश चव्हाण , द्वितीय क्रमांक  आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु , तर तृतीय क्रमांक ग्रामसेवक उज्वल झरकर यांनी पटकावला .मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारीतोषिके देऊन गौरवण्यात आले.

यावेळी  श्री .स्वामी समर्थ प्रासा . भजन मंडळ पाटथर बुवा श्री . महेश पाटील , हनुमान प्रासा . भजन मंडळ  देवगड किल्ला  बुवा श्री . अभय जाधव ,वानिवडे येथील बुवा श्री. बाबा हरम यांनी सुस्वर भजनाच्या माध्यमातुन भजनप्रेमींची मने जिकली.