
देवगड : देवगड, जामसंडे शहरात विविध मंडळामार्फत दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. बाळ गोपाळ या उत्सवात दंग झाले होते. रात्री उशिरापर्यँत हा उत्सव सुरु होता.देवगड, जामसंडे शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच दहीहंडीला सलामी देणाऱ्या पथकाना रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील विविध गोविंदा पथक दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. मानवी मनोरे रचत गोविंदा पथकानी उपस्थिताची मने जिंकली. काही ठिकाणी सहा ते सात थरांचे मानवी मनोरे रचत दहीहंडी उत्सवातील थरार दाखविला. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पावसाच्या अधूनमधून पडणाऱ्या सरी गोपालांचा आनंद द्विगुणित करीत होती.देवगड पोलीस स्थानक गोविंदाने जुने पोलीस स्थानक येथील दहीहंडी फोडून त्या ठिकाणी विराजमान झालेल्या गोविंदाची सेवाद्य मिरवणूक संपूर्ण देवगड परिसरातून देवगड बंदर या ठिकाणी जाते देवगड पोलीस स्थानकाचा गोविंदा ठीक ठिकाणी बांधण्यात आलेल्या दहीहंडी खालून गेल्यानंतर प्रथम मान देवगड पोलिस स्थानकातील गोविंदांना मान दिला जातो काही भागात उंच पाच ते सातच्या दहीहंड्या उभारून विविध मंडळांना पाचारण करण्यात येते व त्यांना सलामीचे रक्कम व अंतिम गोविंदाला योग्य रकमेची पारितोषिके देण्यात आली.