देवगड युवती छेडछाड प्रकरण | प्रमुख संशियीत आरोपीला जामीन मंजूर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 21, 2024 13:52 PM
views 133  views

देवगड : देवगड तालुक्यातील युवती छेडप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या हरिराम मारूती गिते रा. नांदेड याला अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही. एम. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. युवतीची छेड, विनयभंग व अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला प्रमुख आरोपी हरिराम मारूती गीते या संशयिताच्या वतीने अॅड, उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दिनांक २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास देवगड एसटी स्टॅण्ड येथून आनंदवाडी नाका येथे जाणाऱ्या एका १८ वर्षीय युवतीची वसई येथून पर्यटक म्हणून आलेला पालघर जिल्ह्यातील वसई येथील वाहतूक पोलीस कर्मचारी हरिराम गीते याने मद्यधुंद अवस्थेत छेड काढून तिचा विनयभंग करीत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस संशयित गीते याच्यासमवेत गाडीत बसलेल्या प्रवीण रानडे, सटवा केंद्रे, माधव केंद्रे, श्याम गीते, शंकर गीते या साथीदारांनी पीडित युवतीचे अपहरण करण्यासाठी चिथावणी दिली होती.

घटनेच्या वेळेस पीडित युवतीने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी जमा झालेल्यालोकांनीघटनास्थळावरून सर्व संशयितांना पकडून बेदम चोप देत देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले होते.देवगड पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीनुसारसर्वसंशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, १४० (१), १४० (३), १४० (४) सह ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करून मुख्य संशयित हरिराम गीते याच्यासह सहा संशयितांना अटक केली होती.यातील हरिराम गिते वगळता उर्वरीत पाच संशयितांना यापुर्वीच न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. तर गिते याच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणी होऊन न्यायलायात संशयिताच्यावतीने सादर केलेल्या घटनास्थळाची सॅटेलाईट ईमेज, ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज विचारात घेऊन फिर्यादीतील घटनेचे वर्णन आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील विरोधाभास न्यायालयासमोर आणून दिला होता.