देवगड किल्ला गणपती मंदिरात विविध कार्यक्रम !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 08, 2024 09:41 AM
views 289  views

देवगड : मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी श्री गणपती मंदिर देवगड किल्ला येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.

सकाळी ७ वा. अभिषेक व पूजन सकाळी ८ वा.श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी १० वाजता महाआरती सकाळी ११ वाजता सुश्राव्य स्थानिक भजने, १२ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा. माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवगड किल्ला येथील श्री गणपती मंदिर यांच्या कडून भाविकांना करण्यात आले आहे.