युवा महोत्सावाच्या विभागीय विजेते पदाचे देवगड महाविद्यालय मानकरी...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 04, 2023 16:38 PM
views 78  views

देवगड : २०२२-२३  वर्षां मध्येसंत राऊळ महाराज महविद्यालय, कुडाळ येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीत जास्तीत जास्त कलाप्रकारात बाजी मारून सिंधुदुर्ग विभागीय सर्वसाधारण विजेते पद देवगड महाविद्यालयाने पटकावले. दि. २८ जुलै २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसाजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या सत्कार समारंभामध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. सुनील भिरूड, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनरल सेक्रेटरी, असोसिएशन ऑफ इंडिअन युनिव्हर्सिटीस, नवी दिल्लीच्या डॉ. पकंज मित्तल यांच्या शुभ हस्ते महाविद्यालयाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच राष्ट्रीय स्तरावर समूह गायन आणि कव्वाली या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याला डॉ. पकंज मित्तल यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सव आयोजन समिती सदस्य तसेच सिंधुदुर्ग विभाग सांस्कृतिक सहसमन्वयक डॉ. नितीन वळंजू यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे तसेच शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सभापती आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.