देवगड युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह शेकडो युवकांचा भाजप मध्ये प्रवेश

देवगड तालुक्यातील पाडगाव, फणसगाव, मोंड परिसरातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Edited by:
Published on: June 12, 2025 21:00 PM
views 357  views

कणकवली : देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते. विशेष म्हणजे, अॅड. माणगांवकर यांच्यासोबत देवगडमधील शेकडो युवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

   सिद्धेश माणगावकर हे युवा विधीतज्ञ असून सहकारामध्ये कार्यरत आहेत ते देवगड नागरी पतसंस्था मध्ये संचालक, वेळगीवे शेती सोसायटी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच अग्रगण्य युथ फोरम देवगड चे अध्यक्ष आहेत.

ॲड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासोबत ॲड. श्रुती सिद्धेश माणगांवकर, माजी सचिव युथ फोरम देवगडचे परिमल नलावडे, देवगडमधील युवा व्यावसायिक सागर गावकर, युथ फोरम देवगडचे सदस्य सौरभ मोंडकर, योगेश कोळसंबकर, पावनादेवी देवस्थान कमिटी पाटगावचे अध्यक्ष विजय गुरव, माजी सरपंच श्रद्धा गुरव, पावनादेवी देवस्थान कमिटी पाटगावचे विश्वस्त दत्ताराम गुरव, वेळगीवे शेती विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रदीप गुरव, पाटगावचे उपसरपंच संदीप गुरव, गावठण वाडी पाटगावचे अध्यक्ष विकास गुरव, गावठण वाडी पाटगावचे सचिव मंगेश गुरव, तसेच विकास तेली आणि विनय पराडकर यांचा समावेश आहे या सोबतच देवगडमधील आकाश जगताप, श्रावण माळी, विराज राजम, दीपक जानकर, शुभम महाजन, पियुष लाड, आशुतोष होनमाने, प्रसन्नजीत बागवे, जयराज राजम, गोविंद शिंदे, कृष्णा कुंभार, मंथन शिरसाठ, सागर कुंभार, घनश्याम मेस्त्री, चैतन्य पांचाळ, प्रणव खिचाडे, प्रथमेश पराडकर, यश मुंडगेकर, अभिषेक वडार, गौरव मांडवकर, गौरव कांदळगावकर आणि शशांक बिरजे यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

देवगड युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगांवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांना  शेकडो युवकांचा पाठिंबा मिळाला आहे.अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या प्रवेशामुळे  देवगड नगरपंचायत मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.