देवगड - बेळगाव एसटी कलंडली !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 22, 2023 18:00 PM
views 2402  views

देवगड : देवगडच्या एसटी आगारातून 11.45 वाजता सुटलेली देवगड-बेळगाव बस फेरी, लिंगडातिठा येथे साईट पट्टीचा अंदाज न लागल्यामुळे गाडी रस्त्याच्या एका बाजूला कलंडली गेली. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु घरोघरी गौरीचे आगमन झाल्यामुळे एसटी फेरी मध्ये म्हणावी तशी गर्दी नसल्यामुळे कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

मात्र जेसीबीच्या साह्याने सदर एसटी योग्य प्रकारे बाहेर काढून गाडी बेळगाव साठी मार्गस्थ करण्यात आली. परंतु झालेल्या घटनेमुळे प्रवासी वर्गांमधून खूप नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.