
देवगड : दाभोळे दहिबांव आणि दाभोळे मिठबांव या मार्गावर रस्त्याचे कामकाज सूरू असल्याने या मार्गावरील नियमित एस.टी.फे-या कुणकेश्वर कातवण मार्गे फिरविण्यात आलेल्या आहेत. यामुळे दाभोळे गावातील देवगड हायस्कूल व महाविदयालयीन विदयार्थ्यांना दुपारच्या सत्रांत परतिचा प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या विदयार्थ्यांना देवगड आगारातून दुपारी १.१० नंतर सुटणा-या देवगड दाभोळे गणेश नगर या एस.टी.फेरीत या प्रवास करण्यासाठी मुभा देण्याकरीता दाभोळे पोलीस पाटील सानिका प्रदिप कदम व महिलावर्गाने लेखी निवेदनाव्दारे देवगड आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांचे लक्षवेधले.
या प्रसंगी मिताली विराज दाभोळकर,प्राची प्रदिप घाडी, अनुष्का अरविंद नवलू, रविना राजेंद्र घाडी, पल्लवी प्रकाश घाडी, श्रेया तातू घाडी, सानिका संदिप घाडी, सुलोचना सुनिल घाडी, अमिषा अरविंद घाडी, विनिता विश्वनाथ घाडी, सुचिता संतोष घाडी, रिया रविंद्र नवलू, प्रज्ञा प्रदिप घाडी, श्रीकला वासूदेव घाडी, आदी महीला उपस्थित होत्या.
आगार प्रमुख घोलप आणि वाहतूक नियंत्रक श्रीकांत सैतावडेकर यांनी विदयार्थ्यांना होत असलेला मनस्ताप लक्षात घेवून सर्व उपस्थित महिलांची विनंती मान्य करत देवगड आगारातून दुपारी १.१० नंतर सुटणा-या देवगड दाभोळे गणेश नगर या एस.टी.फेरीतून देवगड हायस्कूल व महाविदयालयीन विदयार्थ्यांना परतीचा प्रवासास मुभा दिली. आगार प्रमुख घोलप आणि वाहतूक नियंत्रक सैतावडेकर यांची विदयार्थ्यांच्या प्रती असलेली दिलासादायक भूमिका विचारात घेवून त्यांचे जाहिर आभार मानले.










