देवगड बांदेगावात गणेश मंदिराचा वर्धापनदिनाचं आयोजन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 30, 2025 14:06 PM
views 104  views

देवगड : देवगड येथील बांदेगावातील " श्री क्षेत्र गणेश मंदिराचा ४७ वा वर्धापन दिन सोहळा '' दि. ६ व ७ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार असून श्री गणेश व इतर देवदेवतांची पूजा आणि सामुदायिक "श्री'' चा अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आमंत्रित प्रसिद्ध बुवांची सुस्वर भजने सादर  करण्यात होणार आहेत. तरी या शुभमंगल सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री क्षेत्र गणेश मंदिर न्यासाचे विश्वस्त व सदस्य यांची आवाहन करण्यात आले आहे.