
देवगड : देवगड हडपिड येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नुकत्याच त्यांच्या नव्या ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट या संस्थेचे प्रेरणास्थान व सल्लागार नंदकुमार पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठात जावून समस्त कार्यकारिणीने आशीर्वाद घेतला. यावेळी संस्थेचे सचिन लोके (संस्थापक अध्यक्ष, प्रशांत साटम (संस्थापक सचिव) ज्योती जाधव (संस्थापक खजिनदार) प्रकाश जोंईल (विश्वस्त) प्रकाश पावसकर (विश्वस्त) मधुसूदन भडसाळे (विश्वस्त), तात्या निकम (विश्वस्त) उपस्थित होते.
यावेळी प्रथम अनाथाश्रम, वृध्दाश्रम स्थापन कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी नूतन संस्थेचे संस्थापक विश्वस्त यांचे अभिनंदन करण्यात आले.










