
देवगड : देवगड जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील शिक्षक सुजित संदीप फडके हे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन फिजिक्स विषयात त्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता पात्रता (सेट) या स्पर्धा परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेतील शिक्षक सुजित संदीप फडके उत्तीर्ण होऊन फिजिक्स या विषयात प्रशंसनीय यश संपादन केले आहे.
सन २०२५ मध्ये पार पडलेल्या या स्पर्धा परीक्षेला महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण ९०३६६ (नव्वद हजार तीनशे सहासष्ट ) स्पर्धक प्रविष्ठ झाले होते. त्यात ६०५० स्पर्धक उत्तीर्ण होऊन सेट परीक्षेचा निकाल ६.६९ टक्के लागला.
सुजित फडके यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अॅड. अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










