
देवगड : देवगडचे सुपुत्र अमित जामसंडेकर यांच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथविधी समारंभचे थेट प्रेक्षपण आज देवगड कॉलेज येथे होणार आहे. एका खेड्यातून, देवगडच्या लाल मातीतील व्यक्तीने बुद्धी आणि कष्टाच्या जोरावर एवढ्या उच्च पदावर पोहोचणे हा देवगडकरांसाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अमित सत्यवान जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे.त्यांच्या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपन आज मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता देवगड कॉलेज येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विकास मंडळ, देवगड तर्फे करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक, मान्यवर व विद्यार्थी या थेट प्रेक्षपण सोहळ पाहण्यासाठी देवगड महाविद्यालय येथे उपस्थित राहणार आहेत .










