वागदे येथे विकासकामाचा धडाका सुरूच

सलग दुसऱ्या दिवशीही विविध विकास कामांची झाली उद्घाटने | सरपंच रुपेश आमडोसकर यांच्या पाठपुराला यश
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 28, 2022 18:05 PM
views 386  views

कणकवली : वागदे विकास कामाचा धडाका सुरू असून आज पुन्हा वागदे ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांची उद्घाटन करण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा वागदे डंगळवाडी नंबर 2 च्या  दुरुस्ती ,वागदे डंगळवाडी सार्वजनिक नळपाणी योजना  विहीर दुरुस्त करणे व पंप शेड बांधणे,वागदे डंगळवाडी विष्णू नारायण घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट करणे आणि वागदे बौद्धवाडी येथे सभा मंडपाचे देखील कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे वागदे ग्रामपंचायततिने विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरूच आहे.


वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी गेली पाच वर्ष सातत्याने ग्रामपंचायतीसाठी आणलेला विकास निधी व केलेले प्रस्ताव तसेच ग्रामपंचायत सदस्य ललित घाडीगावकर व इतर सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . त्यामुळेच आज वागदे येथे झालेल्या विविध विकास कामांची उद्घाटन आज  पार पडली. 


आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, सदस्य ललित घाडीगांवकर, माझी उपसरपंच श्रीधर घाडीगांवकर, रवींद्र गावडे, गौरी बागवे, संजना गावडे, साक्षी तोरस्कर ,संजय ताटे, सुनिता हिर्लेकर, कडूलकर गुरुजी साक्षी मेस्त्री, जानवी मेस्त्री, आरती मेस्त्री ,संतोष मेस्त्री, कोमल गावडे, मनीषा गावडे, संजना गावडे, सुषमा गोसावी, दीपक गोसावी,मनोहर घाडीगांवकर, सुरेंद्र कदम, प्रकाश घाडीगांवकर, विजय घाडीगावकर,संतोष कदम, रमेश आमडोसकर संभाजी घाडीगांवकर, अनंत घाडीगांवकर, शंकर घाडीगांवकर, नयन गावडे, शरद सरंगले, सुधाकर गोसावी, अमित घाडीगांवकर, सहदेव कदम, सत्यवान कदम,मधूकर कदम,सुभाष कदम, रंजन कदम, विनायक गावडे, निलेश गावडे, सोमा घाडीगांवकर, भालचंद्र घाडीगांवकर, शैलेश घाडीगांवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे गावच्या विकासाला  चालना मिळणार आहे