नारायण राणेंच्या माध्यमातून विकासाला अधीक गती मिळेल : युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले

'डोअर टू डोअर' प्रचाराचा फोडला नारळ
Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2024 13:00 PM
views 104  views

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. देव पाटेकर चरणी त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे‌. त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी व सिंधुदुर्गचा विकासाला अधीक गती मिळेल असा विश्वास सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. युवराज्ञींच्या हस्ते महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासकीलवाडा येथे करण्यात आला.

यावेळी युवराज्ञींनी राणेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.देवी वटसावित्री समोर नतमस्तक होत राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, या भागातून मला मिळाली त्यापेक्षा अधिकची मत नारायण राणेंच्या मागे उभी करणार, शहरातून सर्वाधिक लीड त्यांना प्राप्त करून देणार.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, केतन आजगावकर, मिसबा शेख आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.