
देवगड : देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त देवगड तालुक्यातील मच्छीमार महिलांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. यावेळी अण्णा खवळे, गुरुदत्त परुळेकर, सुधीर बापट, राजेंद्र मेस्त्री, अनिल खडपकर ,शामल जोशी, स्वाती बापट, विजू तावडे, ममता धुरत, मीनल मेस्त्री, अश्विनी मोहिते बाळा लळीत आदी उपस्थित होते.देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड जामसंडे येथील मच्छीमार महिलाना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी मच्छीमार महिलांची विजे अभावी गैरसोय होऊ नये या साठी त्यांची गरज ओळखून त्यांनी यावेळी या कंदिलाचे वाटप केले.
यावेळी सौर कंदील वाटप महिला विभागाच्या प्रमुख विश्वस्त शामल जोशी यांनी या समन्वय समितीच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली.यावेळी सर्व मच्छीमार महिलांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.










