दाभोळेत महिला दिनी महिलांसाठी मार्गदर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 06, 2026 12:36 PM
views 19  views

देवगड : प्रगती एज्‍युकेशनल गायडन्‍स असोसिएशन आणि अे. जे. वाचनालय दाभोळे यांच्‍या संयुक्‍त विदयमाने ८ मार्च रोजी दाभोळे ग्रामपंचायत येथे सायंकाळी तीन वाजता जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्‍ताने महिलांसाठी डॉ. प्रकाश पाटोदरे  वैदयकिय अधिक्षक ग्रामीण रूग्‍णालय देवगड यांचे महिला सक्षमिकरणात आरोग्‍याचे महत्‍व  विषयक मार्गदर्शन आणि कायदयांचे अभ्‍यासक .प्रदिप कदम सर, यांचे महिला सक्षमिकराणात भारतीय संविधानाची भूमिका या विषयी मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे औचित्‍य साधून देवगड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्‍या .स्‍नेहा श्रीकृष्‍ण अनभवणे आणि दाभोळे बौध्‍दवाडी अंगणवाडीच्‍या, ज्‍येष्‍ठ  अंगणवाडी सेविका रूपा रविंद्र चव्‍हाण  व त्‍यांच्‍या मदतनीस सुनिता धोंडू अनभवणे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यथोचित सत्‍कार केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी.श्रीकृष्‍ण अनभवणे सरपंच ग्रामपंचायत दाभोळे,.प्राची  बर्वे, उप सरपंच ग्रामपंचायत दाभोळे,पांडूरंग शेटगे ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं.दाभोळे , .संदिप सरवदे ग्राममहसूल अधिकारी दाभोळे ,.प्रणाली मराठे, केंद्रप्रमूख अशा प्रमूख मान्‍यवरांची उपस्थित राहणार असल्‍याची माहिती स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा  सानिका कदम यांनी प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे दिली आहे.