कुणकेश्वर यात्रोत्सवात कापडी पिशवी वापरायचं आवाहन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 16, 2026 19:20 PM
views 7  views

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवात मा. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाविकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक यात्रा साजरी करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारणे काळाची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मा. गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सिंधुदूर्ग मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतुन यात्रेदरम्यान जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे  यंदा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.