आरोंदा - रेडी मार्गावरील अपघातातील चालकाचा मृत्यू

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 16, 2026 19:46 PM
views 32  views

सावंतवाडी : आरोंदा ते रेडी मार्गावरील आदर्शनगर येथे भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन गटारात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. नारायण बाबाजी नाईक (वय ४२, रा. आरोंदा आग्राळवाडी) असे मृत चालकाचे नाव असून सोबत असलेला रत्नाकर गंगाराम नाईक रा.आरोंदा हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली.नारायण नाईक हे आपल्या ताब्यातील मारुती ८०० कार  घेऊन आरोंदा ते रेडीच्या दिशेने जात होते. आरोंदा आदर्शनगर येथील सरळ रस्त्यावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन जोरात धडकली असता ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले रत्नाकर गंगाराम नाईक (रा. आरोंदा आग्राळवाडी) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले.

या घटनेची फिर्याद आरोंदा जाधववाडीचे पोलीस पाटील जितेंद्र गंगाराम जाधव यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. खंदरकर, आरोंदा दूरक्षेत्राचे ए.एस.आय. आरवारी आणि हवालदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरवारी करत आहेत