वरवडेत राणेंना मताधिक्य देण्याचा निर्धार..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 30, 2024 05:25 AM
views 342  views

कणकवली : तालुक्यातील वरवडे गावामध्ये गावातील ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरघोस मतांनी निवडून देणार असा निर्धार करण्यात आला.  सोमवारी श्री. देव भैरवनाथ, श्री.देव लिंगेश्वर ,श्री.दिर्बादेवी या  मंदिरांमध्ये श्रीफळ वाढवून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. यावेळी संतोष चव्हाण, प्रकाश सावंत, अशोक राणे ,सोनू सावंत, अक्षय राणे ,विजय कदम ,काना मालकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.