सावंतवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Edited by:
Published on: February 09, 2025 14:14 PM
views 243  views

सावंतवाडी : राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सावंतवाडी येथे शिवसैनिकांना केक कापून व सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा केला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. पुढील पंधरा दिवस वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केक कापून श्री.शिंदे यांच्या यांच्या दिर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक, नगरपालिका सफाई मित्र, एसटी,रिक्षा चालकांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, उपाध्यक्ष राजा भिसे, सचिव प्रकाश राऊत, सुधीर धुमे, अरुण मेस्त्री, आनंद माधव, मनोहर मसुरकर, शामसुंदर नाईक, आनंदा रेमुळकर, गंगाराम मेस्त्री, सुभाष नाईक, रामचंद्र सावंत, शिवाजी नागवेकर, अजित शिरोडकर, उल्हास सातार्डेकर, महेश गावडे, प्रसाद गवस, बाळकृष्ण पास्ते, सतीश गवस, संतोष सातार्डेकर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहराप्रमुख बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, माजी नगरसेविका किरण नाटेकर, शर्वरी धारगळकर, पुजा नाईक, लतिका सिंघ, नंदू शिरोडकर, शिवानी पारकर, अनिता शिंदे, सुप्रिया नाईक, स्नेहा नाईक, नीलम परब, शुभांगी तुयेकर, प्रतीक्षा तुयेकर, साधना मोरे, सुलोचना गावडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यानंतर रूग्णांना फळवाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम तालुक्यात राबविण्यात आले.