मणेरी मुख्य रस्त्याकडे उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी वेधलं लक्ष

सा. बां. ला जाग
Edited by: लवू परब
Published on: April 08, 2026 16:07 PM
views 132  views

दोडामार्ग : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मणेरी मुख्य रस्ता ते तळेवाडी, आंबेली रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरु करा अशी मागणी पं. स उपसभापती गणेश प्रसाद गवस यांनी केल्या नंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. 

मणेरी मुख्य रस्ता तळेवाडी, धनगरवाडी, आंबेली हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. रस्ता मंजूर होऊन कित्येक दिवस उलटले होते. मात्र रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरु केले नव्हते. याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग पं. स उपसभापती गणेश प्रसाद गवस, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारत तात्काळ कामाला सुरु वात करा अशी मागणी केली होती. या मागणी नंतर 15 दिवसात रस्त्याच्या कामाला सुरवात करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आज सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.