विभाग नियंत्रकांवर प्रश्नांचा भडीमार

साळगावकरांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांकडून विचारला जाब
Edited by: विनायक गांवस
Published on: July 15, 2024 07:48 AM
views 184  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय नियंत्रण राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक सावंतवाडी बस स्थानकात 'प्रवासी राजा दिना'च्या  कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सावंतवाडी एसटी स्थानकाच्या व्यवस्था दुरावस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांकडून त्यांना जाब विचारण्यात आला. 

सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आज प्रवासी राजा दिनी राज्य परिवहन सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक सावंतवाडीत आले असता त्यांना प्रवाशांनी घेरले. सावंतवाडी बसस्थानकाची पुरती दुरावस्था झाली आहे. प्रवाशांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. याला जबाबदार कोण ? असा जाब माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विभाग नियंत्रकांना विचारला‌‌. तर स्थानिक आमदारांच असलेलं दुर्लक्षच या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, राजा शिवाजी चौक उपाध्यक्ष दीपक सावंत,  रिक्षा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर पराडकर, मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, अशोक पेडणेकर उमेश खटावकर, दिलीप पवार, संजय साळगावकर, बंटी माठेकर, दीपक भराडी, बंड्या तोरसकर आदी उपस्थित होते.